मनमाड पासून जवळच असलेल्या नागापुर येथील पुरातन हेमाडपंथी नागेश्वर मंदिरात असलेल्या दानपेट्या चोरटयांनी फोडल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्यांचा शोध लावण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे. शहर परिसरात सतत होणाऱ्या चोऱ्या, दुचाकी वाहनांच्या चोऱ्या या बरोबरच आता चोरटयांनी मंदिरातील दानपेट्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे.
बघा व्हिडिओ – नांदगाव तालुक्यातील मोरझर येथे झाडावर वीज कोसळली, हीरेनगर येथे दोन म्हशी दगावल्या
काल रात्री नांदगाव तालुक्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी...











