loader image
[ays_poll id=7]

केंद्र सरकार च्या सर्व लोक कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी पूर्ण लाभ घ्यावा : डॉ सचिनकुमार पटेल

Nov 28, 2022

केंद्र सरकार च्या सर्व लोक कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी पूर्ण लाभ घ्यावा : डॉ सचिनकुमार पटेल पंतप्रधान स्व निधी कर्ज योजने अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वितरण मनमाड – कोरोना संकट काळात अर्थ कारणाला मदत व्हावी म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही महत्वकांक्षी योजना जाहीर केली.याच अंतर्गत येणाऱ्या पंतप्रधान स्व निधी कर्ज योजनाच्या 20 लाभार्थ्यांना एच डी एफ सी बँक मनमाड शाखे द्वारे प्रत्येकी रुपये 10000 /- स्व निधी कर्ज वाटप कार्यक्रम मनमाड नगरपालिकेच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानीय योजने चे नूडल अधिकारी व मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल,हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा भटके विमुक्त आघाडी नाशिक जिल्हा सरचिटणीस व मनमाड नगरपरिषद पथ विक्रेता नियोजन समिती अकबर शाह, एच डी एफ सी बँक मनमाड व्यवस्थापक अमोल सैद,मनमाड शहर अभियान व्यवस्थापक संदीप अगोने, अशोक पाईक, इम्तियाज सैय्यद आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. संदीप अगोने यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रम चे प्रास्ताविक केले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी एच डी एफ सी बँकेने मनमाड शहरात ही पंतप्रधान स्व निधी योजना ऑनलाईन पद्धतीने राबविली म्हणून त्यांचे कौतुक करीत शहारातील सर्व बँकानी ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबवावी आणि या केंद्र सरकार च्या सर्व लोककल्याणकारी योजनांची योग्य जाहिरात करावी अशी सूचना मांडली तर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारतीताई पवार यांचे मार्गदर्शनांमध्ये मनमाड नगरपरिषद कार्यक्षेत्रात पंतप्रधान स्व निधी कर्ज योजने सह केंद्र सरकार च्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना ची अंमलबजावणी सक्षमतेने सुरु असून शहारातील नागरिकांनी या योजना चा पूर्ण लाभ घ्यावा असे आवाहन मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांनी आपले अध्यक्षीय भाषणातून केले. एच डी एफ सी बँक मॅनेजर सैद व अकबर शाह यांनी देखील विविध महत्वपूर्ण सूचना आपले मनोगत तून व्यक्त केल्या. गेल्या दीड वर्षात मनमाड शहरात सर्व बँका च्या माध्यमातून 360 पेक्षा जास्त पथ विक्रेता लाभार्थी ना 40 लाख रुपयांचे कर्ज वाटप पंतप्रधान स्व निधी योजने अंतर्गत वितरण करण्यात आले.सुमारे 150 प्रलंबित कर्ज प्रकरणे महिन्यात वितरण होतील व यंदाच्या आर्थिक वर्षात 500 पेक्षा जास्त पथ विक्रेते या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. सर्व मान्यवर च्या हस्ते पंतप्रधान स्व निधी चे एच डी एफ सी बँक मनमाड द्वारे मंजूर
लाभार्थी:
सलीम गफूर भगवान,
संजय भीमराव आहिरे,
राजेश पुंडलिक कापडने,
राजू तुकाराम पगारे,
मुश्ताक चांद शाह,
रहीम इमाम शाह यांना प्रतिनिधीक स्वरूपात निधी वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, अकबर शाह, संदीप अगोने यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.