loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन – दि.२९ नोव्हेंबर २०२२- चंपाषष्ठी

Nov 29, 2022


अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत,मल्हारी मार्तंड अर्थात जेजुरी चा राजा खंडोबा.
मार्गशीर्ष महिन्यात ‘शुद्ध षष्ठी’ ही चंपाषष्टी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी पर्यंत सहा दिवसाची खंडोबाची नवरात्र असते. जेजुरी मध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. चंपाषष्ठी ला मनोभावे खंडोबा ची आराधना केली जाते.
या दिवशी वडे-घागरयांचा तसेच अंबोळीचा नैवद्य असतो.तसेच या दिवशी वांग्याचे भरीत व भाकरीचा नैवद्य देवाला दाखविला जातो.व काही नैवद्य कुत्र्याला त्याची पूजा करून खाऊ घालतात.
महाराष्ट्रात सर्वत्र हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणेने व खंडोबाची तळी भरून वाजत गाजत चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो.
रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून सर्वांना चंपाषष्ठी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
– फलक रेखाटन – देव हिरे.
(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर,संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.