loader image
[ays_poll id=7]

गोवर रुग्णांनाही व्हावे लागणार क्वारंटाईन – टास्क फोर्स चे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश !

Nov 29, 2022

गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता विलगीकरण केले जाणार असून टास्क फोर्सच्या बैठकीत यासंदर्भातील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. गोवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी संशयित गोवर रुग्णांची संख्या 10 हजार 544 वर पोहोचली आहे. तर गोवरची लागण झालेल्यांची संख्या 658 वर पोहोचली आहे.

तब्बल तीन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरात पहिल्यांदा लॉकडाऊन लागले. तसेच कोरोनाची लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले होते. वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने ही पावले उचलली होती. सध्या राज्याच गोवरच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत.

गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवावे, असे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयीन व्यवस्था करण्याचे निर्देशही टास्क फोर्सने दिले आहेत. त्याचप्रमाणे कुपोषित बालकांना गोवर आजाराची लागण झाली असेल, तर त्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा त्यांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्व ‘अ’ चा डोस द्यावा, असे निर्देशही टास्क फोर्सने प्रशासनाला दिले आहेत.

ग्रामीण भागातही सर्वेक्षण होत आहे.
मुंबईत उद्रेक झालेल्या गोवर रुग्णांच्या संख्येने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर औरंगाबाद शहरात गोवर संशयित आढळून आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. ग्रामीण भागातील लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली आहे.

गोवर संसर्गाची लक्षणे कोणती?

सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भिती असते.

अजून बातम्या वाचा..

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.