loader image
[ays_poll id=7]

राज्यस्तरीय युथ ज्युनिअर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी 5 सुवर्ण 6 रौप्य व 5 कांस्यपदकासह युथ मुलींचे सांघिक विजेतेपद व मुकुंद आहेर ठरला स्पर्धेतील ज्युनियर व सिनियर गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू

Nov 29, 2022


रावेर येथे 24 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान संपन्न झालेल्या खुल्या युथ ज्युनिअर व सिनियर महाराष्ट्र राज्य स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले महाराष्ट्रातील 300 खेळाडूंमध्ये चुरशीची लढत प्रत्येक वजनी गटात बघायला मिळाली मनमाड च्या खेळाडूंनी नाशिक जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करीत लक्षणीय कामगिरी बजावली
55 किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याने ज्युनिअर व सिनियर दोन्ही गटात सहभागी होत चमकदार कामगिरी करीत दोन सुवर्णपदके पटकावून ज्युनिअर व सिनियर गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान व रोख दोन हजार रुपयांचे पारितोषिक ही पटकावले वरीष्ठ गटात मुलांमध्ये विक्रमी कामगिरी करीत सुवर्णपदक पटकवणारा मुकुंद नाशिक जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

40 किलो वजनी गटात महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित मनमाड महाविद्यालयाच्या वीणाताई संतोष आहेर हिने नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले क्लिन जर्क चा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला 45 किलोवजनी गटात छत्रे विद्यालयाच्या मेघा संतोष आहेर हिने आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत ज्युनिअर मध्ये सुवर्णपदक व युथ मध्ये कांस्यपदक पटकावले मुकुंद विना व मेघा या तीनही भावंडांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून एक आगळा वेगळा विक्रम स्थापित केला आहे 73 किलो वजनी गटात के आर टी हाय स्कुल च्या साइराज राजेश परदेशी यान युथ मध्ये सुवर्णपदक व ज्युनिअर मध्ये रौप्यपदक मिळवीत शानदार कामगीरी बजावली युथ मुलींमध्ये लागोपाठ तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नवीन विक्रम करणारी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणारी विक्रमवीर आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरू गोविंदसिंग हाय स्कुलची आकांक्षा किशोर व्यवहारे हिने या राज्यस्तरीय स्पर्धेत 40 किलो वजनी गटा ऐवजी 45 किलो या नवीन वजनी गटात पहिल्यांदाच सहभागी होत कमी कालावधीत उत्तम कामगिरी करीत रौप्यपदक पटकावले मनमाड महाविद्यालयाची दिया किशोर व्यवहारे हिने 45 किलो सिनिअर मध्ये रौप्यपदक व ज्युनिअर मध्ये कांस्यपदक करुणा रमेश गाढे हिने 71 किलो वजनी गटात रौप्यपदक, मनमाड महाविद्यालयाच्या नूतन बाबासाहेब दराडे 55 किलो वजनी गटात सिनियर मध्ये कांस्यपदक धनश्री विनोद बेदाडे हिने 81 किलो वजनी गटात रौप्यपदक पूजा श्याम वैष्णव हिने 55 किलो वजनी गटात रौप्यपदक साक्षी वानखेडे हिने 59 किलो वजनी गटात कांस्यपदक व छत्रे विद्यालयाच्या श्रावणी विजय पुरंदरे हिने 49 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवीत उत्तम कामगिरी बजावली गुड शेफर्ड हाय स्कुलचा कृष्णा संजय व्यवहारे, मनमाड महाविद्यालयाच्या वैष्णवी वाल्मिक इप्पर, वैष्णवी जनार्धन उगले,खुशाली निवृत्ती गांगुर्डे,वैष्णवी शुक्ला,जयराज परदेशी यांनी स्पर्धेत सहभागी होत चांगली कामगिरी केली
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ अरुण पाटील,क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे एस व्ही,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस,यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.