Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे चार पेपर पुढे ढकलले

Nov 29, 2022

PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून चार मुख्य परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, असे एमपीएससीने जाहीर केले आहे.

२४ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ हा पुढे ढकलण्यात आला आहे. सोबतच ३१ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा, ७ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २, राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा आणि १४ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील एक प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील आयोगाने म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

संत गाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले  थोर संत समाजसुधारक- प्राचार्य डॉ अरुण पाटील

संत गाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले थोर संत समाजसुधारक- प्राचार्य डॉ अरुण पाटील

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे संत गाडगे महाराज...

read more
मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे आरती दाभाडे सोनवणे हिच्या हत्येचा तीव्र निषेध

मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे आरती दाभाडे सोनवणे हिच्या हत्येचा तीव्र निषेध

शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे आज सौ आरती दाभाडी सोनवणे यांच्या मृत्यूचा जाहीर निषेध...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]