Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे चार पेपर पुढे ढकलले

Nov 29, 2022

PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून चार मुख्य परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, असे एमपीएससीने जाहीर केले आहे.

२४ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ हा पुढे ढकलण्यात आला आहे. सोबतच ३१ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा, ७ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २, राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा आणि १४ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील एक प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील आयोगाने म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात पत्रकारांची भक्कम एकजूट विधायक उपक्रम राबविणार; पत्रकार दिनी निर्धार

नांदगाव तालुक्यात पत्रकार संघाची भक्कम एकजुट तयार करण्याचा निर्धार व्यक्त करत पत्रकारांपुढील बदलती...

read more

गिरणानगर वासियांचा न.पा. हद्दीत समवेशास हिरवा कंदील – ठराव सर्वानुमते मंजूर !

नांदगाव शहराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर...

read more

येवल्यात सावित्रीमाईं फुलेंच्या जयंतीनिमित्त मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेत गोलमेज परिषद संपन्न”

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]