Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसेना कुणाची? आता सुनावणी १२ डिसेंबर रोजी

Nov 30, 2022

शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरे यांची? या संबंधी महत्त्वाची सुनावणी पुढील महिन्यात पार पडणार आहे. निवडणूक आयोगासमोर येत्या 12 डिसेंबर रोजी ही सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले होते. तसेच दोन्ही गटांना वेगळी नावे सुद्धा देण्यात आली होती. आता येत्या 12 डिसेंबरला शिवसेनेवर कुणाचा दावा प्रबळ ठरतोय, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागुन आहे.
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. २३ नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादरही करण्यात आले आहेत.

शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर आमदार अपात्रतेचा आणि शिवसेना पक्षाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला. मात्र कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही पक्षांना नावं आणि चिन्ह देण्यात आली.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.
या दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छानणी आता केली जाईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी पहिली सुनावणी केली जाईल. या सुनावणीवेळीही अंतिम निकाल लागण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, काही महापालिका निवडणुकांपूर्वीही शिवसेना पक्षचिन्हाचा वाद सुटला नाही तर दोन्ही गटातील नेत्यांना ढाल तलवार आणि मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल, अशी शक्यता आहे.

अजून बातम्या वाचा..

पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा मनमाड शहर राष्ट्रवादी पक्षाने केला निषेध

पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा मनमाड शहर राष्ट्रवादी पक्षाने केला निषेध

राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या...

read more
भाग क्र. 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भोगवटदार वर्ग 2 उतारे मिळण्याकरीता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात

भाग क्र. 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भोगवटदार वर्ग 2 उतारे मिळण्याकरीता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात

प्रभाग क्र. 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक विभागातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण कायम करण्यासाठी...

read more
जनहित याचिका दाखल होताच रेल्वे प्रशासनाने घेतला गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय : ११ एप्रिल पासून धावणार

जनहित याचिका दाखल होताच रेल्वे प्रशासनाने घेतला गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय : ११ एप्रिल पासून धावणार

तोट्यात चालत असल्याने लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आलेली मनमाड -कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पुढील तीन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]