loader image
[ays_poll id=7]

लोकसभेच्या मा.सभापती सुमित्राजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडियन हायस्कुलचा शताब्दी महोत्सव सोहळा संपन्न…

Dec 1, 2022

मनमाड 🙁 योगेश म्हस्के ) येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंडियन हायस्कुलचा शताब्दी महोत्सव सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा पल्लवी मंगल कार्यालय येथे प्रमुख मान्यवरांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मनमाड शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील मानबिंदू असणारी आणि हजारो विद्यार्थी घडवणारी इंडियन हायस्कुल यंदाच्या वर्षी शंभर वर्षाची झाली असुन वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शाळेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे , शाळेच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्ताने शताब्दी महोत्सव सोहळा आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राजी महाजन आणि जेष्ठ साहित्यिक , कवी आणि शाळेचे माजी विद्यार्थी अशोक जी नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . या कार्यक्रमास नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे , नासिक शिक्षण प्रसारक मंडळाचे राजेंद्र कलाल , आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माता सरस्वती आणि शाळेचे संस्थापक कै.दत्तात्रय सप्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शाळेच्या लोकमान्य सभागृह येथे शाळेच्या शंभर वर्षाच्या इतिहासातील गुणवंत माजी विद्यार्थ्यांचे छायाचित्र आणि शाळेचे कला शिक्षक राजेश पाटील यांनी शाळेमध्ये आत्तापर्यंत विविध विषयांचे फलक रेखाटन केलेल्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते , या प्रदर्शनास देखील अनेक मान्यवर आणि माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

पल्लवी मंगल कार्यलय येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक हर्षद गद्रे , प्रस्ताविक शाळेचे संचालक राजेंद्र गुप्ता , प्रमुख पाहुण्यांचा परिचय विकास काकडे यांनी केले तर उपस्थित मान्यवर आणि माजी विद्यार्थ्यांचे आभार कुलकर्णी सर यांनी मानले , या कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थी , संचालक मंडळ, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.