loader image
[ays_poll id=7]

के.आर. टी. शाळेच्या साईराज परदेशीची वेटलिफ्टींग स्पर्धेत चमकदार कामगिरी

Dec 2, 2022

रावेर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युध ज्युनियर व सिनियर वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड येथील कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या साईराज राजेश परदेशी या विद्यार्थ्याने सहभागी होवून अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले तर ज्युनियर स्पर्धेत रौप्यपदक मिळविले.

तसेच साईराज राजेश परदेशी याने रावेर येथे झालेल्या वेटलिफ्टींग स्पर्धेत क्लिन व जर्क या प्रकारात १४० किलो वजन उचलले व स्नॅच या प्रकारात ११४ किलो वजन उचलले.

साईराज राजेश परदेशी विदयार्थ्याच्या या स्पृहणीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

साईराज राजेश परदेशी हा विदयार्थी जय भवानी व्यायामशाळेत सराव करीत असून त्यास मुख्य प्रशिक्षक म्हणून श्री. प्रविण व्यवहारे सर व के. आर. टी. हायस्कूलचे क्रीडाशिक्षक श्री. विशाल झाल्टे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.