Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Dec 2, 2022

मनमाड येथे झालेल्या तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत मनमाड येथील कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुलांच्या गटाने सहभाग घेतला.

या स्पर्धेत सार्थक सुनिल वाढवणे या विदयार्थ्यांने बुध्दिबळात ५ गुणांपैकी साडेचार गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला तर स्मित दिपक मकवाणे या विदयार्थ्यांने ५ पैकी ४ गुण प्राप्त करत चौथा क्रमांक मिळवला. वरील दोन्ही विदयार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली.

वरील विदयार्थ्याच्या या स्पृहणीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, प्राथमिक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

वरील दोन्ही विदयार्थ्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. विशाल झाल्टे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीर रित्या कचरा जाळल्या मुळे रेल्वे स्थानका ची सुरक्षा धोक्यात : डॉ भारती पवार यांचे कडून तातडीने दखल

मनमाड रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीर रित्या कचरा जाळल्या मुळे रेल्वे स्थानका ची सुरक्षा धोक्यात : डॉ भारती पवार यांचे कडून तातडीने दखल

मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या मध्य रेल्वेच्या मनमाड रेल्वे स्टेशन वर आणि परिसरात दररोज...

read more
यंदाच्या IPL सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

यंदाच्या IPL सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

आयपीएल स्पर्धेचा पंधरावा सिझन 26 मार्चपासून मुंबईतून सुरू होणार आहेत. मात्र यंदाच्या आयपीएल मॅचवर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]