loader image
[ays_poll id=7]

निसर्गाचा चमत्कार; पुण्यात चक्क झाडाला लगडले बटाटे

Dec 3, 2022

पुणे: बटाटा हे कंदमुळ म्हणून त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली उगवते. पण हिच बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला येतात तेव्हा. आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरं आहे. पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावात चक्क झाडाला बटाटे लागले आहेत. युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या झाडाला चक्क १८ ते १९ बटाटे लगडले आहेत. हे बटाटे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे माळरानावर वळसे पाटील यांची शेती आहे. साडेतीन एकरावर त्यांनी बटाट्याची लागवड केली आहे. बटाटा पीक काढणीला आलेला आहे. अंतिम टप्प्यातील पाला काढण्याचे काम सुरू आहे. या पाल्याची कापणी करत असताना वळसे पाटील यांना त्यांच्या पिकातील एका झाडाला चक्क बटाटे आलेले दिसले. हे बटाटे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एवढे दिवस बटाटे लागवड करत आसताना आतापर्यंत अशी गोष्ट पहायला मिळाली नाही. मात्र यंदाच्या वर्षी बटाटा चक्क झाडाला लगडलेले असल्याने त्यांना आश्चर्य वाटले.आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारभावही बटाट्याला चांगला मिळतो. या भागात अनेक ठिकाणी बटाटे काढणीला आले आहेत. जमिनीत बटाटे येतात तसेच हे बटाटे जमिनीच्या वर आले आहेत. थंडीमुळे जमिनी खालचा बटाटा हिरवा पडतो त्याच प्रमाणे हा बटाटा देखील हिरवा पडला आहे. बटाटे झाडाला लगडलेले दिसल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय होत असून लोकं गर्दी करत आहेत.

आजच्या आधुनिक शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग घेतले जात आहेत. त्यातून अनेक युवा शेतकरी शेतीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक पारंपारिक ठराविक ऋतूत निघणारी पिके आता आधूनिकीकरणामुळे सगळ्या ऋतूमध्ये घेता येऊ लागली आहेत. बटाटा हे शक्यतो मुरमाड जमिनीवर येणारे पीक आहे. मात्र झाडाला लगडलेले बटाटे ही मात्र पहिलीच घटना घडली असावी. एका झाडाला १८ ते १९ बटाटे आलेले आहेत. म्हणजेच पीक सुद्धा तेवढ्याच जोमात आले आहे. येणाऱ्या काळात जमिनीवर देखील बटाटा येऊ शकतो, असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.