loader image
[ays_poll id=7]

शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी आयएएस तुकाराम मुंढे

Dec 3, 2022

आपल्या काम करण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याअगोदर दोन महिन्यापूर्वीच सप्टेंबर अखेरीस मुंढे यांच्यावर आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. डॉ. रामस्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आता साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत यांच्या जागी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला आहे.

दरम्यान, भाग्यश्री बानायत यांची नागपूरच्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळामध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यातच मुंढे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्यासह इतर सहा आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
तुकाराम मुंढे यांची नियुक्ती शिर्डी येथे झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केलाय. त्याचबरोबर त्यांच्या धडाकेबाज अंदाजात शासन चालण्याच्या पद्धतीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाची शिस्त असो किंवा इतर समस्या अशा अनेक कारणामुळे तुकाराम मुंढे यांची डॅशिंग अधिकारी म्हणून तुलना केली जाते. त्यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी असताना त्यांनी अनेक ठिकाणी अचानक भेटी देऊन तेथील गैरसोईंबाबत बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.