हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या नागपूर ते शिर्डी या ५२९ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या ११ डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते होणार आहे. तत्पूर्वी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आणि एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्याची व्यक्तिशः पाहणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीचे सारथ्य करत नागपूर ते शिर्डी पर्यंत प्रवास केला.

एफ सी आय गहू कामगार पतसंस्थेच्या चेअरमन पदी नंदू बेदाडे
मनमाड शहरातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदू किसन बेदाडे यांची नुकतीच...