loader image

मनमाड शहरामध्ये श्री दत्त जयंती सोहळ्याला भक्तिभावाने सुरुवात

Dec 5, 2022


मनमाड : ( योगेश म्हस्के )शहरातील श्री दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री दत्त जयंती सोहळ्याला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून सुरवात झाली.

श्री दत्त मंदिर येथे दिनांक 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन, या मध्ये सकाळी 7 ते 8 अभिषेक ,महाआरती 8 ते 12 श्री गुरुचरित्र पारायण ,1 ते 2 भजन , 3 ते 5 कीर्तन , 6 ते 7 हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये देखील यंदाच्या वर्षी भव्य स्वरूपात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत असुन , श्री स्वामी समर्थ दरबाराचे सेवेकऱ्यांकडुन सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. दिनांक 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये श्री गुरुचरित्र , श्री नवनाथ पारायण , विणा वादन , स्वामीचरित्र ग्रंथ वाचन , श्री स्वामी समर्थ जपमाळ अखंड प्रहारे , होम-हवन आदी धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सात दिवस सुरू असणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्यामध्ये शहरातील जास्ती-जास्त भक्त परिवार आणि नागरिकांना सहभागी व्हावे असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.


अजून बातम्या वाचा..

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
.