loader image
[ays_poll id=7]

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मांडवड विद्यालयाचा संघ द्वितीय

Dec 5, 2022

नांदगाव – (सोमनाथ घोंघाने)
नाशिक जिल्हास्तरीय पार पडलेल्या शालेय कबड्डी स्पर्धा यामध्ये नांदगाव तालुक्यातील मांडवड कयेथील जनता विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.

याबाबत वृत असे की स्व मीनाताई ठाकरे विभागीय स्टेडियम नाशिक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा मध्ये १७ वर्षे मुलींच्या गटांमध्ये जनता विद्यालय मांडवड तालुका नांदगाव या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. पहिल्या साखळी सामन्यामध्ये त्रंबकेश्वर संघाला दहा गुणांनी पराभूत केले येवला संघाला बारा गुणांनी पराजित करून विजयाची घोडदौड पुढे सुरू ठेवून सेमी फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला. सेमी फायनल मध्ये चांदवड तालुक्याचा बारा गुणांनी दणदणीत पराभव करून अंतिम सामन्यामध्ये आपला प्रवेश निश्चित केला. नांदगाव नाशिक या तालुक्यांमध्ये झालेला अंतिम सामन्यांमध्ये नाशिक संघाने नांदगाव संघाला सात गुणांनी पराभूत केले.ज्योस्तना आहेर ,कर्णधार, साक्षी आहेर,वैष्णवी पिंगळे, श्रुती आहेर, श्रुती वाडेकर, वैष्णवी दरगुडे, ईश्वरी आहेर, शुभांगी चोळके ,आशा आहेर,कावेरी महाडिक,हर्षदा मोहिते या खेळाडूंनी अतिशय सुंदर खेळ करीत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेतेपद प्राप्त केले, या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री संदीप आहेर,गणेश गुरखा या सर्वांचे यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस मा श्री नितीन भाऊ ठाकरे, तालुका संचालक श्री अमित भाऊ बोरसे पाटील, विठ्ठल आबा आहेर, व्यंकट आहेर, प्रशांत आहेर, अशोक निकम, मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे एस.एम, यांच्यासह सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
.