loader image
[ays_poll id=7]

बेळगावजवळ कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून महाराष्ट्राच्या ६ ट्रक वर दगडफेक – राज्यभर संतापाची लाट

Dec 6, 2022


महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेळगावसह जत, अक्कलकोट आदी भागांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर आज बेळगावजवळ कन्नड संघटनांनी उच्छाद मांडला. कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे आज बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर आज कन्नड संघटनांचा विरोध आणि मंत्र्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यासाठी बेळगाव सीमेवर आज मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला. तरीदेखील कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे.


अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.