loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ डिसेंबर २०२२ – बुधवार

Dec 7, 2022


मेष राशी : आज कामामध्ये अनेकांचे सहकार्य लाभेल. आज नातेवाईकांसोबत नाते अधिक मजबूत होईल.

वृषभ राशी: नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक स्थिती असेल. जिद्द आणि चिकाटी सोडू नका. कोणत्याही व्यक्तीच्या दबावाखाली निर्णय हा घेऊ नका. नवीन योजनावर काम करण्यावर भर द्या.

मिथुन राशी : आज तुम्हाला एखादी महत्वाची वार्ता समजेल. व्यावसायिक गोष्टी विचार करून मगच त्याबद्दल आपले मत द्या. ताजाराकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क राशी : काही व्यक्तींना आरोग्यासंबंधी तक्रारी जाणवतील. आपले मनोधैर्य खचू देऊ नका. आजच्या दिवसाचे योग्य नियोजनावर करा. घरामध्ये आनंदी वातावरण असेल.

सिंह राशी : तुमचा प्रभाव इतरांवर पडेल.आरोग्य हे उत्तम असेल. अति उत्साह दाखवू नका. मनाची चंचलता जाणवेल. अतिविचार करणे टाळा. आज तुम्ही इतरांच्या मदतीला धावून जाल.

कन्या राशी : धाडसी निर्णय घेऊ नका. आज खर्च वाढेल. कौटुंबिक मदभेत होण्याची शक्यता असल्यमुळे वाणीवर सायं ठेवा. कामामध्ये एकाग्रता ठेवा. कामामध्ये वरिष्टांकडून सहकार्य लाभेल.

तूळ राशी : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमंडळीचा सहवास लाभेल. तुमच्या बुद्धीकौशल्यावर lok खुश होतील. तरुण वर्गाकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

वृश्चिक राशी : जमिनीविषयीचे व्यवहार होतील.  दिवसभराच्या कामाचे चिंतन करा. बौद्धिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल.

धनू राशी : तुमचा धार्मिक कामामध्ये सहभाग असेल. क्षुल्लक गैरसमजुतीमधून वाद वाढू शकतो. कोणत्याही कामामध्ये घाई करू नका. अन्वषक खर्च करणे टाळा.

मकर राशी : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या कामामध्ये हुशारी दाखवा. आज तुमच्यासाठी संमिश्र घटकांचा दिवस असेल. होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करा. व्यवसायामध्ये प्रगती होईल.

कुंभ राशी : घरामध्ये सामंजस्याने वागा. आरोग्या संबंधित तक्रारी कमी होतील. मोनोबळ वाढवणारी घटना घडेल. टाकलेलं पाऊल मागे घेऊ नका. काही कामे उगाच अडकून राहिल्यासारखी वाटू शकतात.

मीन राशी : आज प्रवास शक्यतो टाळा. भागीदारीमध्ये नवीन संधी प्राप्त होतील. परोपकाराचे महत्व तुम्हाला लक्षात येईल. इतरांच्या आनंदामध्येच आपला आनंद माना.


अजून बातम्या वाचा..

.