loader image
[ays_poll id=7]

संत झेवियर हायस्कूल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Dec 7, 2022

मनमाड: येथील संत झेवियर हायस्कूल मध्ये महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, माननीय पर्यवेक्षिका सिस्टर शैला, मा. फादर लॉईड व कुमारी ऋतुजा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी ऋतुजा जाधव हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली. तर माननीय मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक पैलूची ओळख करून दिली. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. अशोक गायकवाड सर यांनी आपल्या सुमधूर आवाजात भिमगीत गाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संगीतमय आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दर्शना वामन ढोमसे तर आभार प्रदर्शन कुमार हितेश राऊत यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.