loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Dec 8, 2022

मनमाड शहरातील श्री छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत सतत होणारी टाळाटाळ आणि दिरंगाई तसेच प्रशासनाकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षा विरोधात मराठा समाजाचे नाना आबाजी शिंदे आणि विष्णू शंकर चव्हान हे सोमवार दिनांक १२ डिसेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनाचा आशय असा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मनमाड मध्ये गेल्या कित्येक वर्षापासुन अर्धकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे. जेव्हापासुन महाराजांचा अर्धकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे तेंव्हापासुन आजपर्यंत या पुतळयाच्या सुशोभिकरणा विषयी मनमाड नगर परिषदेमार्फत कुठेही लक्ष दिले गेलेले नाही. वा याबाबत पालिकेने कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. याबाबत गेल्या १० ते १५ वर्षापासुन अनेक संघटनांनी व त्यांचे कार्यकर्ते यांनी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत मागणी करून निवेदने दिली असुन देखील पालिकेकडुन त्यास प्रतिउत्तर म्हणुन फक्त आश्वासणेच मिळाली प्रत्यक्षात कृती झालेली नाही.

मागील शिवजयंतीला म्हणजे १९ फेब्रुवारी २०२२ ला सांगितले गेले की येत्या चार महीन्यात महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम पुर्ण होईल. यासाठी नाशिकच्या शिवभक्ताला याविषयीचे डिझाईन व आराखडा करून देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु चार महीने होऊन देखील याबाबत पालिकेतर्फे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे टेंडर पास केलेले नाही वा सुशोभिकरण्याच्या कामास सुरुवात केली असे दिसत नाही.

महाराजांची जयंती जवळ येत आहे तरी याबाबत प्रशासनाकडुन कोणतीही दखल घेतली जात नसेल व आख्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या महाराजांच्या विषयी असे राजकारण होत असेल तर याच विषयाचा राग, संताप मनमाड मधील सर्व शिवभक्त यांना आहे. सर्व शिवभक्त याविषयी सुशोभिकरणाचे काय झाले असा प्रश्न करीत आहेत. परंतु पालिकेमार्फत वा लोकप्रतिनिधींमार्फत याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नसेल तर मी स्वतः नाना आबाजी शिंदे व श्री विष्णु शंकर चव्हाण सोमवार दिनांक १२ / १२ / २०२२ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे सुशोभिकरण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहे. जर प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही तर त्यावेळी होणाऱ्या परिणामांस मनमाड नगर पालिका जबाबदार असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. ही विनंती कळावे.

आमरण उपोषणकर्ते

नाना आबाजी शिंदे व विष्णु शंकर चव्हाण आमरण उपोषणाचे स्थळ: श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक आमरण उपोषण दिनांक १२.१२.२०२२ वार सोमवार वेळ : सकाळी ठिक १०:००

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.