loader image
[ays_poll id=7]

प्रभाग क्रमांक १० मध्ये होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम उदंड प्रतिसादात संपन्न

Dec 8, 2022

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू असलेला आनंदोत्सवातील आज ५ वा कार्यक्रम प्रभाग क्रमांक १० मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला, आजचा होम मिनिस्टर कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमास प्रभागातील महिलांनी तुडूंब गर्दी केली होती, यात गृहिणी, बाल गोपाल तसेच वयोवृध्द मातांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली तसेच कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या प्रसंगी करंजवण पाणी योजना कशी असणार आहे ,पाणी कसे येणार आहे यावर सविस्तर माहिती असलेली चित्रफित उपस्थित महिलांना दाखवली. विशेष म्हणजे या योजनेचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार असून या पुढे मनमाडकर माता भगिंनिंसाठी २ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ज्यात आपणास करंजवण मनमाड पाणी योजनेचे काम कसे सुरू आहे हे थेट तिथे जाऊन दाखवले जाणार असून यात आपला चहा नाश्ता व प्रवासखर्च आण्णा स्वखर्चातून देणार आहेत.
लवकरच प्रत्येकाच्या घरात नियमित पाणी येणार या आनंदाने अनेक महिलांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आण्णा व ताई यांचे आभार ही मानले.
आज झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात आले. विविध खेळातील प्रथम विजेत्यांना प्रत्येकी टिव्ही, डिनर सेट तसेच ट्रॉली बॅग देण्यात आली. सोबतच अनेक विजेत्यांना पैठण्या तर विविध बक्षिसे ही या वेळी महिलांनी प्राप्त केले.
आजचा कार्यम यशस्वी करण्यासाठी शिवसेना, महीला आघाडी, युवासेना मनमाड शहर पदाधिकारी, शिवसैनिकांनी मेहनत घेतली.

विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
नावे
1) सौ. कल्याणी खैरनार
(सिल्वर मेडल वेटलिफ्टिंग)
(2) सौ. सायरा मोहम्मद खान
3) सौ. जनाबाई कांबळे
4) सौ. रेवती सुमंत जोशी
: (सोशल वर्कर थापर बिल्डिंग)
5)
6) सौ. अनिता मधुकर गोरे
: (समाजसेविका )
7)
8) सौ. नीता मनोज गांगुर्डे
(माता रमाई महिला अध्यक्ष जमदाडे चौक)
9) सौ. चौरसिया ताई
(राम मंदिर महिला भजनी मंडळ)
10) सौ. स्नेहल (मुक्ताताई ) सद्गुरे, सामाजिक कार्यकर्ते,
11) सौ. जानवी मॅडम मेहानी
(प्रिन्सिपल श्री डी वाय स्कूल)
12) सौ. अहेमदी चांद शेख
(सोशल वर्कर 52 नंबर)
13) सौ. अरुणा गौतम जाधव
(R.P. शहर संपर्कप्रमुख)
14) सौ. उषाताई खरात
(समाज कार्यकर्ता)
15)
(16) सौ. संगीता ताई परदेशी
(आरोग्य विभाग सेविका)
17 ) सौ. चामिलाबाई भास्कर वाघ
(सामाजिक कार्यकर्ते )
18) सौ. प्रतिभा संदीप पाटेकर
( सामाजिक कार्यकर्ते )
19) सौ. अनुराधा चंद्रकांत माळवतकर
( सामाजिक कार्यकर्ते )

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.