loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नाशिक – सिन्नर महामार्गावर पळसे येथे बस पेटल्याने दोन जणांचा मृत्यू

Dec 8, 2022


नाशिक – नाशिकरोड राजगुरूनगरहून नाशिककडे येणार्‍या बसने पुढे उभ्या असलेल्या बसला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात बस पेटल्याने दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पळसे येथे आज दुपारी घडली. या धडकेत राजगुरूनगरहून येणारी बस जळून पूर्ण खाक झाली असून, बसमधील प्रवासी सुखरूप आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे, की आज दुपारी राजगुरूनगर डेपो येथून नाशिककडे एमएच 07 सी 7081 या क्रमांकाची बस येत होती. ही बस पळसेजवळ आली असताना त्या बसच्या पुढेच एमएच 14 बीटी 3635 या क्रमांकाची सिन्नर डेपोची बस उभी होती.

त्या बसमधून प्रवासी उतरत असताना राजगुरूनगरच्या बसने समोर असलेल्या दोन दुचाकीस्वारांना जोरात धडक दिल्याने ते दोघे या दोन बसमध्ये दाबले गेले. समोरील बसला धडक दिल्यानंतर क्षणात राजगुरूनगरच्या बसने पेट घेतला. घटना घडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बसच्या काचा फोडून सुखरूप बाहेर काढले; मात्र दुचाकीवरील दोघांचा या अपघातात नाहक बळी गेला.

ही आग अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी विझविली. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्याने वाहतूक विस्कळित झाली.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
.