मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यां पासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो.
वृषभ – मित्र व स्वकीयांसह हिंडण्या – फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस काही त्रास संभवतो.
मिथुन – आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. मित्रांसह सहलीला जाऊ शकाल.
कर्क – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील.
सिंह – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे आपणास संयमित राहावे लागेल.
कन्या – विरोधकांवर मात करू शकाल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक व शारीरिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल.
तूळ – आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल.
वृश्चिक – आपल्या बोलण्याने किंवा कृतीने कुटुंबीय दुखावतील व त्यामुळे कटुता निर्माण होईल.
धनु – आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हितावह राहील. दुपार नंतर कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
मकर – दुपार नंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. इतरांशी बोलताना गैरसमज होण्याची शक्यता आहे.
कुंभ – पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. व्यापारातील येणे वसूल होईल. मित्र भेटतील.
मीन – परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह व थकवा दोन्हीही जाणवतील.




