loader image
[ays_poll id=7]

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून मंत्रिपदावरून हटवा – मनमाड शिवसेनेचे आंदोलन

Dec 11, 2022

मनमाड – भाजप नेते तथा उच्चशिक्षित मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान केला आहे. अशा वाचाळवीर शिक्षणमंत्र्यांना तात्काळ मंत्रीपदावरून हटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनमाड शहर युवासेनेच्या वतीने आंदोलन करत करण्यात आली. यावेळी पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शहर युवा सेनेच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

पैठण येथे आयोजित कार्यक्रमात भाजपचे नेते शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून बेताल वक्तव्य करत महाराष्ट्राचा अपमान केला आहे. पाटील यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले असून अशा मंत्र्यांची महाराष्ट्राला गरज नाही त्यामुळे भाजपने चंद्रकांत पाटील यांना तात्काळ शिक्षणमंत्रीपदावरून हटवावे अशी मागणी करत युवा सेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. व सदर मंत्र्यांने केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहिर निषेध करत निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख माधव शेलार, जिल्हा संघटक संजय कटारिया, विनय आहेर, दिनेश केकान, शैलेश सोनवणे, इरफान शेख, सनी फसाटे, लियाकत शेख, पप्पू परब, कैलास भाबड यांच्यासह मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.