loader image
[ays_poll id=7]

माजी मंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर

Dec 12, 2022


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अखेर जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयांच्या जात मुचल्यावर देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण सीबीआयकडून या निकालाला स्थगिती देण्याची विनंत केली गेली. यावर मुंबई उच्च न्यायालाने सीबीआयचे म्हणणंही मान्य केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्या जामीनाला आता १० दिवसांची स्थगिती मिळाली आहे. आम्हाला या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची आहे त्यामुळे १० दिवस स्थगिती द्यावी अशी विनंती सीबीआयनं उच्च न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस तरी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत.

सीबीआयच्या सत्र न्यायालयानं अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला होता. त्याला देशमुख यांच्यावतीनं सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती आणि सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. आज न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निकाल देताना अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. यात न्यायालयानं काही अटी समोर ठेवल्या आहेत. यात अनिल देशमुख यांना आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा लागणार आहे. तसंच आठवड्यातून दोन दिवस ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.

न्यायालयाच्या आजच्या सुनावणीवेळी देशमुख यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप केला होता. मुंबईतील बार मालकांकडून दरमहा १०० कोटींचे वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला होता.


अजून बातम्या वाचा..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
.