loader image

बघा व्हिडिओ – शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी एक सुवर्ण,दोन रौप्य, दोन कांस्यपदकासह उत्तम कामगिरी

Dec 13, 2022


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित राज्यस्तरीय शालेय 17 व 19 वर्षे मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे करण्यात आले महाराष्ट्रातील आठ विभाग व राज्य क्रीडा प्रबोधिनीच्या 160 खेळाडूंनी दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर होणाऱ्या स्पर्धेत कमालीची चुरस निर्माण केली.

 

जयभवानी व्यायामशाळेच्या व कला वाणिज्य व विज्ञान महा वी मनमाड च्या साक्षी भाऊसाहेब वानखेडे हिने 59 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले 55 किलो वजनी गटात पूजा श्याम वैष्णव हिने रौप्यपदक पटकावले, छत्रे विद्यालयाच्या आनंदी विनोद सांगळे हिने 71 किलो वजनी गटात आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक,श्रावणी विजय पुरंदरे हिने 49 किलो वजनी गटात कांस्यपदक करिष्मा रफिक शाह हिने 76 किलो वजनी गटात कांस्यपदक,सरस्वती विद्यालयाच्या पूर्वा दीपक मौर्य व छत्रे विद्यालयाच्या दिव्या उपेंद्र सोनावणे,श्रावणी वाल्मिक सोनार या खेळाडूंनी चतुर्थ क्रमांक मिळवीत समाधानकारक कामगिरी बजावली
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ अरुण पाटील,क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे एस व्ही,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
.