loader image
[ays_poll id=7]

के.आर.टी. शाळेच्या श्रावणी चव्हाण या विद्यार्थिनीच्या प्रोजेक्टला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Dec 17, 2022

प्रेमलाताई पॉलिटेक्निक कराड, जिल्हा सातारा येथे दिनांक १२/१२/२०२२ रोजी संपन्न झालेल्या भव्य राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात , मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम शाळेमधील विद्यार्थिनी कु.श्रावणी अमर चव्हाण हिने सुमारे ६००+ विद्यार्थ्यांच्या मधून प्रथम क्रमांकाचे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. तिने सादर केलेले प्रोजेक्ट चे नाव होते पिझोइलेक्ट्रिक सेन्सर्स च्या सहाय्याने विद्युत निर्मिती हा प्रोजेक्ट सुंदररित्या सादर करताना तिने परीक्षकांना उत्तमरीत्या ह्या वेगळ्या आणि आजच्या युगात या प्रकारची विद्युत निर्मिती कशी उपयुक्त ठरू शकेल, एवढेच नाहीतर या प्रकारच्या विद्युत निर्मिती मुळे निसर्गाचे कसे संरक्षण होणार आहे याचेही महत्त्व सांगितले.
वेगळा विषय, उत्तम मॉडेल मेकिंग, उत्कृष्ट सादरीकरण आणि निसर्गाला कुठलीही हानी न करता आपल्या देशातील वाहतुकीचा आणि हायवेज तसेच रेल्वेच्या वाहतुकीचा वापर करून प्रचंड विद्युत निर्मिती करता येवू शकेल, या वैशष्ट्यपूर्ण प्रोजेक्ट मुळे परीक्षकांनी जवळपास ६०० च्या वर सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रथम उत्तेजनार्थ म्हणून प्रोजेक्ट ची निवड करून बक्षीस दिले.
के आर टी शाळेचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे,विश्वस्त धनंजय निंभोरकर, प्राचार्य मुकेश मिसर,उपप्राचाय॔ वैभव कुलकर्णी या सर्वांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कम॔चारी यांनी सुद्धा अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.