loader image
[ays_poll id=7]

मनमाड न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न

Dec 17, 2022

मनमाड- तालुका विधी सेवा समिती, मनमाड व मनमाड वकिल संघ यांचे संयुक्त विद्यमाने मुख्य मध्यस्थी केंद्र उच्च न्यायालय, मुंबई यांचे अॅक्शन प्लॉन २०२२ – २०२३ अन्वये मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक १७/१२/२०२२ रोजी न्यायदान कक्ष, सह दिवाणी न्यायालय के स्तर, मनमाड येथे दुपारी २:०० वाजता करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती. श. आ. लोमटे, दिवाणी न्यायाधीश, क-स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, मनमाड यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते.

सदर मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे प्रसंगी मा. श्री. ए. आर. मुक्कनवार, सह दिवाणी न्यायाधीश, क-स्तर, मनमाड हे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. सदर शिबीर प्रसंगी मनमाड न्यायालयातील पक्षकार मनमाड वकिल संघाचे पदाधिकारी व वकिल वर्ग कर्मचारी, पक्षकार उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अँड. श्री. किशोर एम. चोरडीया यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रसंगी तालुका विधी सेवा समिती, मनमाड चे पॅनल अॅड. रमेश. बी. अग्रवाल यांनी उपस्थीतांना मध्यस्थी बाबतची प्रकिया व फायदे विषयी माहीती दिली. त्यानंतर अॅड. अमिर एस. खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अखेरीस मा. श्री. ए.आर. मुक्कनवार साहेब, सह दिवाणी न्यायाधीश, क-स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, मनमाड यांच्या मध्यस्थी या विषयावर मार्गदर्शनपर अध्यक्षिय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेकामी मनमाड न्यायालयातील न्यायिकअधिकारी, मनमाड वकिल संघाचे पदाधिकारी, वकिल वर्ग व न्यायालयीन कर्मचारी तसेच पी. एल. व्ही. यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.