loader image
[ays_poll id=7]

नांदगांव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व

Dec 20, 2022


नुकत्याच झालेल्या नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागला असून आमदार सुहास (अण्णा) कांदे यांच्या नेतृत्वाखाली १५ पैकी १४ ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाला सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे.
अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टांगणीला होत्या अशातच राज्यभरात ७५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. नांदगाव तालुक्यातील एकूण १५ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या या निकालात पंधरा पैकी १४ ग्रामपंचायतीत शिंदे गटाने बाजी मारली आहे. नांदगाव तालुक्यात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विकास कामांचा सपाटा लावलेला असून तालुक्यात विकास पर्व सुरू आहे. याचाच परिणाम आजच्या ग्रामपंचायत निकालातून दिसून आला. आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या दमदार विकास कामांच्या जोरावर तालुक्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध झाले आहे.
या विजयाचा जल्लोष आज आमदार सुहास कांदे यांचे नांदगाव संपर्क कार्यालयात करण्यात आला. थेट जनतेतून सरपंच पदावर निवडून आलेले राजेंद्र सयाजी पवार नागापूर, मंजुषा जीवन गरुड पिंपरखेड, सुनिता कांतीलाल चव्हाण कसाबखेडा, शरद अशोक काळे धोटाणे खुर्द, भिका ठका बिन्नर शास्रीनगर यांचे सह ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देशमुख, सुधीर देशमुख, अनिल काळे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विजयी सरपंच व सदस्यांनी संपर्क कार्यालयात येऊन गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नव निर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, नंदू पाटील युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शहर प्रमुख सुनील जाधव,आय्याज शेख, प्रकाश शिंदे, महेंद्र गायकवाड आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
.