loader image
[ays_poll id=7]

काव्यझुला काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

Dec 22, 2022


नांदगाव ( प्रतिनिधी) चांगल्या पध्दतीने शब्दांची साधना करुन अतिशय दर्जेदार काव्यझुला हा काव्यसंग्रह प्रा.नारायणे सरांनी तयार केला आहे. कोविड पासून पावसापर्यंत, निसर्गापासून-प्रेमापर्यन्त, अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत त्यांची साहित्य साधना परिपक्व आहे. त्यांच्याकडून समाजाला जागृत करणारी कविता भविष्यात निश्चित होईल.त्यांच्या कवितेतून अनेक विषय मांडले असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विनोद गोरवाडकर यांनी केले.
कृष्णाई लाॅन्स, हनुमान नगर, नांदगाव
येथे कवी प्रा.सुरेश नारायणे यांच्या काव्यझुला या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ.विनोद गोरवाडकर व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी प्राचार्य लक्ष्मण महाडीक,मा. नगराध्यक्ष राजेश कवडे, सिध्दी प्रकाशन चे प्रकाशक लेखक कवी मा. संदिप देशपांडे सर, उद्योजिका व साहित्यिक स्वाती गुजराथी,प्रा.एस.एन.शिंदे,सौ.रोहिणी मोरे, सुरेश शेळके,प्रा.आर.टी.देवरे, दयाराम गिलाणकर ,आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोरवाडकर म्हणाले ,प्रा. नारायणे यांच्याकडे दैवी प्रतिभा लाभली आहे या प्रतिभेचा वापर करुन त्यांनी त्यांची कविता फुलवुन काव्यझुला हा दर्जेदार काव्यसंग्रह तयार केला आहे.या पुस्तकाचे श्रेय सौ.अलका नारायणे व त्यांच्या दोन्ही मुलांना द्यावे लागेल. तर साहित्य परिषदेच्या रुपाने छत्रपती संभाजी राजे अभ्यासिकाव वाचनालयाचे उदघाटन मा.नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते होत आहे ही अभिमानाची बाब आहे.आता देवालया,पेक्षा ज्ञानालयाची गरज लक्षात घेऊन येथील गिरणानगर ग्रामपंचायतीने ज्ञानाचा दिवा उजळला आहे.असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडीक यांनी केले.
तसेच यानिमित्ताने काव्यझुला या काव्यसंग्रहाचे कवी सुरेश नारायणे एक निर्मल -निरागस त्यांचे मन आहे. समाजातील सर्व कार्यात रममान होणारा कवी आहे त्यांचा काव्यसंग्रह हा हलत्या-डुलत्या मनाचे प्रतिक म्हणजे काव्यझुला हा काव्यसंग्रह होय. तुमची कविता मशाल,ढाल,तलवार झाल्याची बघायची आहे. यावेळी त्यांनी बापाच्या मृत्यू नंतर ही त्यांची समाजातील भ्रष्टाचाराबद्दल चिड व्यक्त करणारी कविता सादर केली . तर नांदगाव हे साहित्याच्या दृष्टीने आश्वासक वातावरण आहे. सिध्दी प्रकाशनने सात पुस्तके प्रसिद्ध केली आहे. नारायणे सरांच्या कवितेतून माणुसपण भावते. त्यांचे नवीन पुस्तक यावे ही सदिच्छा यावेळी सिध्दी प्रकाशनचे प्रसिद्ध कवी, लेखक संदिप देशपांडे यांनी मनोगतात विचार व्यक्त केले.
तर काव्यझुला या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे. यांचे स्पष्टीकरण व काव्यझुला या काव्यसंग्रहातील कवितेतून मनातील वेदना,मनातला आनंद, आजुबाजुच्या घटना कवितेतुन टिपण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. जो कवी असतो त्यांचे अंतरंग स्वस्थ बसु देत नाही आणि मग त्याच्या मनातलं चित्र त्यांच्या कवितेतून दिसून येते.तो अनुभव काव्यझुला या काव्यसंग्रहातून येतो . या संग्रहातील एक-एक कविता वाचली ना मला वाटतं आयुष्यभर जगण्याची शिदोरी काव्यझुला या काव्यसंग्रहाच्या कविता देऊन जातात असे प्रतिपादन काव्यसंग्रह बद्दल प्रसिद्ध उद्योजिका व पत्रकार स्वाती गुजराथी म्हणाल्या.
तर काव्य झुला काव्यसंग्रहाची प्रस्तावना कवी किरण भावसार यांनी दिली आहे या प्रस्तावनेचे वाचन श्री. रमेश घोडके सर यांनी केले. काव्यलेखनाबाबत विचार कवी प्रा. सुरेश नारायणे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.डी. अहिरे यांनी केले. त्यांनी म.सा.प.शाखेचा इतिहास सांगितला तर प्रमुख पाहुण्यांच्या परिचय ॳॅड. सचिन साळवे यांनी करुन दिला.
या कार्यक्रमाचे ईशस्तवन व स्वागतगीत न्यु. इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका श्रीमती अहिरे मॅडम व विद्यार्थ्यांनी म्हटले. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन गझलकार काशिनाथ गवळी यांनी केले.
आभार कवयत्री श्रीमती प्रतिभा खैरनार यांनी मानले त्यांनी काव्य झुला काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाची रांगोळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती.
ॳॅड.उमेश सरोदे, सुनील सोनवणे, अनिल कुटे, संदिप आहेर,किशोर बागले,उमेश उगले हनुमान मित्र मंडळ तसेच म.सा.प.चे सदस्य विद्या देवरे,विलास काकळीज सर, किरण मोरे,पी.आर.पाटील,प्रा.विक्रम घुगे,जयंत कापडणीस,बी.डी.जगताप,निवेदिता सांगळे,सौ.अलका नारायणे, निनाद नारायणे ,हर्षद नारायणे,प्रकाश फणसे,दिपाली घुगे(सांगळे), प्राजक्ता निकम, संदिप वाघापुरे, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.नांदगाव शहरातील पत्रकार,जेष्ठ नागरिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील व साहित्य प्रेमी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.