loader image
[ays_poll id=7]

मनमाडला अंडरपास व फ्लायओवरची अत्यंत गरज : आ.कांदे यांची रेल्वे बोर्डाला मागणी

Mar 1, 2026


मनमाड- दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सुहास कांदे यांनी रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली येथील कार्यकारी निदेशक (बी अँड एस)-1 मा. अभिमन्यु लोबा यांना मनमाड शहरातील वाढत्या वाहतूक समस्येबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

मनमाड जंक्शन हे मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे केंद्रबिंदू असून, दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी व वाहने येथे ये-जा करतात. शहराच्या पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा पुराणा रेल्वे पूल नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत असून, येथे सतत वाहतुकीची कोंडी, वेळेचा अपव्यय तसेच ॲम्बुलन्स व अग्निशमन सारख्या आपत्कालीन सेवांना गंभीर अडथळा निर्माण होत असल्याचे आमदार कांदे यांनी निवेदनात स्पष्ट केले.

शहराचा वेगाने वाढता विस्तार आणि भविष्यातील ट्रॅफिकचा विचार करता, ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे मनमाडकरांना सुरक्षित व सुगम मार्ग उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आ. कांदे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या :

१) मनमाड रेल्वे जंक्शनच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला स्वतंत्र अंडरपास तातडीने बांधकाम करावे.

२) भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून रेल्वे लाईनच्या वर फ्लायओवर उभारण्याची योजना प्राधान्याने हाती घ्यावी.

ही कामे मनमाड शहराच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असून, नागरिकांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार त्यांनी निवेदनाद्वारे केला.

रेल्वे बोर्डाने या संदर्भात सकारात्मक पावले उचलून तातडीने कार्यवाही करावी, अशी मांगणी आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी केली असताना मा. अभिमन्यू लोबा यांनी रेल्वे बोर्डाच्या इतर सदस्य ची चर्चा करून लवकरच या विषयात उचित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या प्रसंगी नगराध्यक्ष योगेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, नगरसेवक माजिद शेख, आझाद पठाण, लाला नागरे, लोकेश साबळे, सनी स्वामी, आसिफ पठाण, निलेश व्यवहारे आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या...

read more
.