loader image
[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आवडत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवावे – विकास दादा काकडे

Dec 22, 2022


नांदगाव ( प्रतिनिधी ) शाळा नियमित विविध उपक्रम राबवीत असते यातून विद्यार्थाचा सर्वांगीण विकास साधत असते.आपल्या मुलाने विविध क्षेत्रात प्रविण्य मिळवावे हीच सर्व पालकांची इच्छा असते.विद्यार्थांनी आपला अभ्यास करता करता ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे आहे त्या क्षेत्राची माहिती घेऊन शालेय जीवनापासूनच त्यात प्राविण्य मिळविल्यास आपण जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन विकास काकडे यांनी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या . नांदगाव येथील व्ही.जे.हायस्कूल वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्सहात संपन्न झाले. या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळा स्नेह संमेलनानिमित्त कला,क्रीडा ,नाट्य ,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.क्रीडा स्पर्धेत कबड्डी ,खो-खो सारखे विविध सांघिक ,वैयक्तिक व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले .सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यानी विविध नृत्य प्रकार सादर केले . वर्षभरात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध स्पर्धा ,परीक्षा यामधील यशाचे कौतुक व प्रोत्साहान देण्यासाठी स्नेहसंमेलनाचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला बक्षीसपात्र विद्यार्थांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे उद्योजक तथा ना.शि.प्र.मंडळ,नाशिक संस्थेचे सदस्य विकास काकडे व अध्यक्ष स्थानी शालेय समिती अध्यक्ष तथा संकुल प्रमुख संजीव धामणे होते.
सुरवातीला लेझीम पथक व एन.सी.सी. पथकाच्या विद्यार्थांनी पाहुण्याचे स्वागत केले.त्यानंतर सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांनी केले. प्रास्ताविकात शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती तसेच वर्षभरात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा व परीक्षेत मिळविलेले यश याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात संजीव धामणे यांनी शाळेतील विविध उपक्रमाचे कौतुक केले व आपल्या संस्कृती बरोबर आधुनिक युगाचा ध्यास धरणारी शाळा आहे अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचल प्रियंका पाटील यांनी केले पाहुण्याचा परिचय राजेश भामरे यांनी करून दिला व आभार उपमुख्याध्यापक दिपक बाकळे यांनी मानले. व शेवटी
उत्कृष्ट ४ समूह नृत्याचे सादरीकरण करण्यात आले .
या प्रसंगी शालेय समिती सदस्य मंदार रत्नपारखी ,मुख्याध्यापक मनोहर बडगुजर ,उपमुख्याध्यापक दिपक बाकळे ,पर्यवेक्षक मनोहर शिंदे ,अकॅडमीक बोर्ड सदस्य भैय्यासाहेब चव्हाण,भास्कर मधे,शिक्षक प्रतिनिधी सुनिता देवरे ,ज्ञानेश्वर डंबाळे तसेच पत्रकार ,तसेच शाळेचे माजी शिक्षक ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.