loader image
[ays_poll id=7]

ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी बाळासाहेबांच्या शिवसेनेत

Dec 22, 2022


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाळगलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ न शकल्याने आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे मत याप्रसंगी भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केले. यासमयी त्यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सहर्ष स्वागत करित त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणावर टीका करण्यापेक्षा ज्या पध्दतीने ते यापूर्वी पक्षवाढीसाठी कार्यरत होते तसेच यापुढे देखील कार्यरत राहतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त

यासमयी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.