loader image
[ays_poll id=7]

“निर्लज्जपणा” शब्द वापरणे भोवले – राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

Dec 22, 2022

सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असून बोलू दिले जात नसल्यामुळे अध्यक्ष महोदय, असा निर्लज्जपणा करू नका, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी आधिवेशन संपेपर्यत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दिशा सालियान प्रकरणावर विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जयंत पाटील यांनी असा निर्लज्जपणा करू नका, असे वक्तव्य केले.
त्यानंतर जयंत पाटील यांच्या विधानामुळे सत्ताधारी भाजपचे आमदार आक्रमक झाले. जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर शंभूराजे देसाई यांनी सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात असं वक्तव्य कुणी करू नये, यासाठी कारवाई करावी अशी मागणी केली.

त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल प्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी ठराव बहुमताने मंजूर केला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. उद्यापासून अधिवेशन संपेपर्यंत अधिवेशनामध्ये येता येणार नाही.

अजून बातम्या वाचा..

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
.