loader image
[ays_poll id=7]

अमृता फडणवीस यांच्या वादग्रस्त विधानाचा काँग्रेस ने घेतला समाचार

Dec 22, 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली असून आज पुण्यामध्ये काँग्रेसने आंदोलन करीत अमृता फडणवीस यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला. ”आपल्या भारत देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत, महात्मा गांधी हे जुन्या भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत’ असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते.अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित ‘अभिरूप न्यायालयात’ त्यांनी हे विधान केलं. आज पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अमृता फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने घोषणाबाजी केली. पुण्यातील गुडलक चौकात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले ‘अक्कल कमी जीभ लांब’ अशा घोषणा दिल्या. तसेच अशा मजकुराचा पाट्या काँग्रेसकडून यावेळी झळकवण्यात आल्या.
“अमृता फडणवीस मामीला मेंदूच्या सर्जरीची गरज होती पण मामीने तोंडाची सर्जरी केली त्यामुळे राष्ट्रपिता आणि राष्ट्रविक्रेता यातला फरक त्यांना कळला नाही” अशी टीका महिला काँग्रेसकडून करण्यात आली. यावेळी शेकडो महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
.