loader image
[ays_poll id=7]

धावत्या रेल्वेत प्रवाशांचे ऐवज चोरणाऱ्यास अटक – मनमाड लोहमार्ग आणि आर पी एफ ची कामगिरी

Dec 24, 2022


मनमाड रेल्वेस्थानकावर गस्त घालणाऱ्या आरपीएफ जवान व लोहमार्ग पोलीस यांनी संयुक्तरीत्या कारवाई करत धावत्या गाडीत चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून जवळपास एक लाख ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.त्याचे नाव मंजूर अहमद मोहम्मद मुस्तकीन, राहणार मालेगाव असे आहे.

मनमाड रेल्वेस्थानकावर गस्त घालत असणाऱ्या आरपीएफ जवान व लोहमार्ग पोलिसांच्या जवानांना वरील आरोपी मंजूर अहमद व त्याच्यासोबत एक बालक संशयरीत्या फिरताना आढळून आले. या दोघांनाही हटकले असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्या सामानाची चौकशी करण्यात आली. यामध्ये लेडीज पर्स व काही मोबाइल मिळून आले.

याबाबत विचारणा केली असता चाळीसगाव ते मनमाडदरम्यान झेलम पंजाब मेल व महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांमधून प्रवाशांकडून चोरी केल्याचे दोघांनी सांगितले. वरील मिळून आलेल्या सामानाबाबत सखोल चौकशी केली असता यातील जवळपास सर्वच वस्तूंबाबत मनमाड, भुसावळ, चाळीसगाव यांसह विविध पोलीस ठाण्यांत फिर्याद दिल्याचे आढळून आले.

यामुळे आरोपी नामे मंजूर अहमद मोहम्मद मुस्तकीन (वय २०, रा. गुलशननगर, मालेगाव ) यास भादंवि कलम ३७९/३४ अंतर्गत अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून जवळपास सहा मोबाइल, एक लेडीज पर्स असा एकूण एक लाख ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या कारवाईत लोहमार्ग पोलीस निरीक्षक एस. बी. जोगदंड, एसआय दिनेश पवार, पोलीस हवालदार बोडके, पोलीस हवालदार महाजन, पोलीस नाईक महेंद्र पाटील, संतोष भालेराव, राहुल राजगिरी आदींनी सहभाग घेतला होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.