loader image
[ays_poll id=7]

दरेगाव ग्रामपंचायतचे सरपंचपद नम्रताकडे उपसरपंच पदासाठी मात्र रस्सीखेच

Dec 25, 2022


गोरक्षनाथ लाड

दरेगाव -चांदवड तालुक्यातील दरेगाव ग्रामपंचायतची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. गत पाच वर्षांपूर्वी निवडणूक बिनवरोध झाली असल्याने व दहा वर्षापासून मतदारांचा कौल नेमका कोणाला हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच होती .अखेर मतदारांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत संमिश्र कौल देऊन सर्वांनाच अचंबित केले. मात्र थेट सरपंचपदाची बाजी नम्रता पॅनलने मारल्याने अखेर सत्तेच्या चाव्या मात्र नम्रता पॅनलच्या हातात आल्या आहेत. तर आता उपसरपंच मात्र कोणाचा याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दरेगाव ग्रामपंचायतच्या इतिहासत प्रथमच तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले. विद्यमान सरपंच अमोल देवरे यांच्या पॅनलने प्रभाग क्रमांक दोन मध्ये तीन उमेदवार उभे केले होते तर थेट सरपंच पदासाठी शांताबाई सोनवणे यांना उभे केले होते. सत्तेच्या विरोधात यावेळी नवीन पॅनलने जन्म घेतला त्याचे नाव परिवर्तन असे होते. मात्र सत्ताधाऱ्याबरोबर जाणारा एक सत्ताधाऱ्यांना विरोधातील एक असे दोन गट पडल्याने परिवर्तन मधील काही उमेदवार नम्रता पॅनल कडे झुकले .प्रभाग क्रमांक तीन मध्ये अरुण तुकाराम गांगुर्डे बिनविरोध निवडून आले. या ठिकाणी सर्वच पॅनलने माघारी घेत त्यांना बिनविरोध साठी पाठिंबा दिला. त्यामुळे तीन प्रभागात आठ जागांसाठी निवडणूक पार पडली. थेट सरपंच पदासाठी परिवर्तन पॅनलच्या ताईबाई उत्तम वाघ यांनी उमेदवारी केली. तर नम्रता पॅनलने सरला जालिंदर पवार यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत नम्रता पॅनलने आठ पैकी आठ जागा लढवल्या ,ग्रामविकास पॅनलने तीनच जागा लढवल्या, तर परिवर्तन पॅनलने पाच जागा लढवल्या. थेट सरपंच पदासाठी नम्रता पॅनलच्या सरला जालिंदर पवार ह्या 823 मते मिळवून विजयी झाल्या. तर द्वितीय क्रमांकवार परिवर्तन पॅनलच्या ताईबाई उत्तम वाघ् ह्या 493 मतं मिळवत द्वितीय क्रमांकावर राहिल्या तर ग्राम विकास पॅनलच्या शांताबाई सोनवणे ह्या 481मते मिळवत तिसऱ्या स्थानी गेल्या. सरला पवार यांनी 330 इतके मताधिक्क्य मिळवत सरपंच पदाचा झेंडा नम्रता पॅनलच्या रूपाने रोवला. प्रभाग क्रमांक एक मध्ये नम्रता पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात लढत झाली. यात नम्रता पॅनलचे संजय दामू जाधव यांनी 128 इतके मताधिक्य मिळवत विजय संपादन केला, तर महिला सर्वसाधारण जागेवर वैशाली विक्रम देवरे यांनी 166 इतके मताधिक्य मिळवत विजय संपादन केला, तर अनुसूचित जमाती स्री या राखीव प्रवर्ग जागेवर सरला जालिंदर पवार यांनी 100 इतके मताधिक्य मिळत विजय संपादन केला .प्रभाग क्रमांक तीन मध्ये परिवर्तन पॅनलच्या दोन्ही जागा विजयी झाल्या. त्यात मंदाबाई श्रीराम पगार यांनी 64 इतके मताधिक्य मिळवत विजय प्राप्त केला तर निवृत्ती भागवत अहिरे यांनी 37 इतके मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक दोन मध्ये तीनही जागा ग्राम विकास पॅनलने जिंकल्या. त्यात समाधान बाबुराव देवरे यांनी 134 इतके मताधिक्य मिळवत विजय संपादन केला, तर इतर मागास प्रवर्गातील स्री राखीव जागेवर योगिता राकेश गांगुर्डे यांनी 170 इतके मताधिक्य मिळवत विजय संपादन केला, तिसऱ्या सर्वसाधारण महिला जागेवर झुंबरबाई श्रावण देवरे यांनी 17 इतके मताधिक्य मिळत विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वाधिक मताधिक्य योगिता राकेश गांगुर्डे यांना 170 तर प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वाधिक मताधिक्य वैशाली विक्रम देवरे यांना 166 इतके आहे. तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये मंदाबाई श्रीराम पगार यांना सर्वाधिक मताधिक्य 64 इतके आहे. त्यामुळे प्रभागांमध्ये निवडणुकीत लढलेल्या आठ जागांपैकी तीन जागा नम्रताकडे तीन ग्रामविकास कडे व दोन जागा परिवर्तन पॅनलकडे गेल्या , त्यामुळे सरपंच पदाची बाजी जरी पर नम्रता पॅनलने मारली असली , तरी उपसरपंच पदासाठी मात्र रस्सीखेच असणार आहे ,कारण वेगवेगळे तीन पॅनल असल्याने सर्वांचेच उपसरपंच पदाचे गणित मात्र बिघडले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
.