loader image
[ays_poll id=7]

सुशासन दिनानिमित्त पोलीस बांधवांसाठी तणावमुक्त जीवन ह्या विषयावर संदीप देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न

Dec 25, 2022


भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे दिनांक 25-12-2022 रोजी जन्म दिनानिमित्त सुशासन दिन पाळण्यात येत असून त्यानिमित्ताने नाशिक ग्रामिण पोलीस दलाचे वतीने मा.श्री. शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण व मा.श्री. अनिकेत भारती, अप्पर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री.समीरसिंह साळवे. उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग यांनी आज रोजी सिता लक्ष्मी हॉल, छत्रे हायस्कूल, मनमाड येथे तणावमुक्त जीवन या विषयावर श्री संदिप देशपांडे सर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी मनमाड उपविभागातील पोलीस निरीक्षक श्री अनिल भवारी, येवला तालुका पोलीस स्टेशन, श्री प्रल्हाद गिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन, श्री गौतम तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडनेर भैरव पोलीस स्टेशन यांचे सह विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. श्री संदिप देशपांडे सर यांनी तणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन करतांना जिवन जगताना प्रत्येक क्षणामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हास्यास्पद घटना कशा घडतात याबाबत किस्से सांगुन उपस्थितांना मनमुराद हसवले. कार्यक्रमाचे शेवटी श्री प्रल्हाद गिते, सपोनि मनमाड पोलीस स्टेशन यांनी उपस्थितांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.