loader image
[ays_poll id=7]

डॉ सारंग जाधव यांच्या रूपाने वैद्यकीय क्षेत्रातील चमकता हिरा हरपला

Dec 25, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगांव शहरातील वैदयकीय क्षेत्रात अगदी कमी वयात आपल्या कामाचा ठसा उमठवनारे डॉ सारंग यशवंत जाधव यांचे आकस्मित निधनाने संपूर्ण नांदगांव तालुकाच नवे तर जिल्ह्यातील संपूर्ण वैदयकीय क्षेत्रच हादरले आहे कमी वयात डॉ सारंग जाधव यांची आयुष्यातून झालेली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका देणारी ठरली आहे

पंचायत समितीचे माजी सभापती डॉ वाय पी जाधव यांचे ते चिरंजीव होते आपल्याच वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडत सर्वसामान्यांची सेवा केली अतिशय शांत संयमी मनमिळावू स्वभाव व सर्वांना नेहमीच मदत करणारे ते व्यक्तिमत्व होते वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असता त्यांनी अनेक रुग्णांना मदतीचा हात दिला वैद्यकीय व्यवसाय या पलीकडे जाऊन सामाजिक भान जपत त्यांनी आपल्या स्वभावाने अनेक जनसामान्य सोबत जोडले होते डॉ सारंग जाधव यांच्या या आकस्मित निधनाने वैद्यकीय क्षेत्रात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे

डॉ सारंग जाधव यांच्या जन्म ८ ऑगस्ट १९८८ झाली झाला १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण नांदगांव शहरातील व्ही जे हायस्कुल येथे घेतल्या नंतर बी,ए, एम, एसचे शिक्षण चाळीसगाव शहरात घेतले यानंतर एम,एस चे वैद्यकीय शिक्षण बेंगलोर शहरात घेतले वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या गावातील तसेच तालुक्यातील जनतेची सेवा वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून देण्याचा त्यांचा मानस होता अगदी कमी वयात त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपलं नावलौकिक करत अनेक गरीब कुटुंबांना देखील त्यांनी आधार दिला होता त्यांच्या या कर्तुत्वान कामगिरीमुळेच गरिबांचे कैवारी अशी ओळख देखील त्यांनी नांदगाव शहरात निर्माण केली होती त्यांचे अवघ्या वयाच्या ३४ व्या वर्षी आकस्मित निधनाने वैद्यकीय क्षेत्रातील चमकता हिरा हरपला अशी भावना देखील अनेकांनी व्यक्त केली

डॉ सारंग जाधव यांचे खूप कमी वयात हार्ट अॅटॅकने दुःखद निधन झाले , सारंग चे पोस्ट मॉर्टेम केले त्या वेळास ही गोष्ट डॉक्टराच्या लक्षात आली की डाॅ सारंग हा पोस्ट कोविड च्या दुष्परिणामांमुळे होणार्या Deep Venous Thrombosis मुळे पायात रक्ताची गुठळी तयार होउन ती गाठ तिथून निसटून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकल्याने severe heart attack येऊन cardiac arrest (हृदय अचानक बंद पडणे) मुळे सारंग चे निधन झाले , सारंग हा डॉक्टर असून देखील त्याच्या कामाच्या व्यापातून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊ शकला नाही आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता रुग्णांची सेवा करण्यात धन्यता मानणारा अशी ओखळ समाज मनात निर्माण करणाऱ्या व सर्वांना हवा हवा वाटणारा डॉ सारंग जाधव यांचे बुधवार दि २१ डिसेंबर रोजी आकस्मित निधन झाले अशा या वैदयकीय क्षेत्रातील चमकत्या हिऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली


अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
.