loader image
[ays_poll id=7]

वणी गडावर भाविकांच्या वाहनाला अपघात; ३० हून अधिक भाविक जखमी

Dec 27, 2022

नाशिक जिल्ह्यातील वणी गडावर भाविकांच्या पिकअप या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वाहनातील ३०हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अपघातात जखमी असलेले सगळे भाविक मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअपने पलटी घेतली आणि हा अपघात झाला आहे. सर्व भाविक या मालवाहतुक करणाऱ्या गाडीने सप्तशृंगी गड येथे दर्शनाला चालले होते. सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटले आणि हा अपघात झाला.
मालेगाव दाभाडी येथील बंडु गांगुर्डे यांच्या पिकअप क्रमांक एमएच १८ बी.झेड. ८१६७ या क्रमांकाच्या पिकअपमधून सदर भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. सदर वाहनातील भाविकांनी आक्रोश केल्यानंतर गडावरील नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना घटनास्थळावरून उपचारासाठी हलवले. यात ३०हून अधिक भाविक जखमी झाले असून जखमींना वणी तर काहींना नांदुरी येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, स्थानिक नागरिक पोलिसांच्या काही ग्रामस्थांच्या साह्याने अपघात स्थळावर बचाव कार्य करण्यात आले आहे. दाभाडी येथील हे भाविक नवीन गाडी घेतल्याने देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. परंतु या नवीन वाहनातून जात असतानाच त्यांचा रस्त्यात अपघात झाला आहे. गडाकडे जाणाऱ्या मार्गावर चढ संपून उतरती लागल्यानंतर वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.