loader image
[ays_poll id=7]

विवेकानंद नगर मध्ये धाडसी घरफोडीने खळबळ

Dec 31, 2022


मनमाड :- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विवेकानंद नगर मध्ये बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व कपाटातील रोख रक्कम आणि दागिने असा १ लाख ४७ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. भर वस्तीत घडलेल्या या चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी वर्षा दर्शन छाजेड (वय ३०) • रा. स्वामी विवेकानंद नगर, कृष्णा हॉटेल, कॉलेज रोड, मनमाड यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे. ही घटना २५ ते २८ डिसेंबर दरम्यान घडली.
फिर्यादी हे बाहेर गावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. ते बाहेर गावाहून आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यावरून मनमाड़ शहर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील वरील तारखेस वरील वेळी व ठिकाणी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे शॉर्ट पोत, कानातील झुमके, अंगठी, नथ, चांदीचे पायल जोड, २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला असे फिर्यादित म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद सरोवर तपास करीत आहेत.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.