loader image
[ays_poll id=7]

रशिया – युक्रेन युद्ध आणि चीन वरील कोरोना संकट ; जगातील एकतृतीयांश भागाला बसू शकतो मंदीचा फटका – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचे भाकीत

Jan 2, 2023

जगातील एकतृतीयांश भागाला २०२३ ह्या वर्षी मंदीचा फटका बसू शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी दिला आहे. अमेरिकेलाही झळ बसेल पण अर्धेअधिक युरोपियन महासंघ आणि चीनसाठी यंदाचे वर्ष खूप कठीण जाण्याची भीती त्यांनी या वेळी व्यक्त केली आहे. ज्या देशांत मंदी नाही अशा देशातील लाखो लोकांनाही झळ बसू शकते.
कोरोना काळात अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर अर्थव्यवस्थावर पूर्वपदावर येऊ लागली होती. आता, मात्र वर्षाच्या सुरूवातीला चिंता वाढवणारी बातमी समोर आल्याने सर्वच जण चिंतेत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेने इशारा देत सुचीत केले आहे की २०२३ हे २०२२ च्या तुलनेने कठीण असणार आहे. या वर्षी २०२३ मध्ये जगातील एक तृतीयांश भागाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा आयएमएफने दिला आहे.
IMF ने जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीन इशारा दिला आहे. चीनला 2023 पासून कठीण प्रसंगाचा सामना करावा लागणार आहे. 40 वर्षांत प्रथमच चीनला मंदीचा सामना करावा लागणार आहे. अगोदर चीनमध्ये अशी परिस्थिती कधी आली नाही. पुढील काही महिने चिनसाठी कठिण असणार आहे. चिनच्या विकासावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक विकासावर देखील याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा या पुढे म्हणाल्या की, रशिया – युक्रेन युद्ध, वाढते व्याजदार आणि चीनमधील कोरोनाचे संकट या सर्व गोष्टींमुळे जागतिक विकासावर परिणाम होत आहे. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला, तेलाच्या वाढत्या किंमती आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्या तुलनेत लोकांचे उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत असल्याचे क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले. जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेले हे संकट कायमस्वरुपी नसून अनेक अर्थव्यवस्था यातून बाहेर पडतील, असा विश्वास क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी व्यक्त केला.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
.