loader image
[ays_poll id=7]

कै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी

Jan 3, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालय पिंपरखेड येथे ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. मनिषाताई जाधव या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसंगी अनेक विद्यार्थीनी सावित्रीमाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीमाई फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवला. विविध गीतांतून त्यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मा. गवळी सर यांनी तत्कालीन शिक्षण पध्दती व त्या अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य, त्याला झालेला विरोध तसेच आज त्यांच्या त्याग व योगदानामुळे समाजातील स्त्रियांना मिळणारा मान-सन्मान, झालेली प्रगती आदी गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आजचा दिवस हा सर्वत्र ‘शिक्षिका दिवस’ म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले.
या निमित्ताने विद्यालयात भव्य प्रमाणात ‘पाककला’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालय परिसरात स्वत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ तयार केले. एकूण १२ गटात ही स्पर्धा झाली. परिक्षणानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा. बोरसे सर, मा. पठाडे सर, मा. शिंदे मॅडम, मा. जाधव सर, मा. सोनवणे सर, मा. संदीप मवाळ मा. आबा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक मा. कांदळकर सर यांनी केले तर आभार मा. निलेश चव्हाण यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.