loader image
[ays_poll id=7]

हिसवळ् बु॥ येथील विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनी साठी स्वंतंत्र बससेवा सुरू करा .

Jan 3, 2023


नांदगाव
नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु. येथे येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करावी यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून आगार प्रमुखांना निवेदन
तालुक्यातील हिसवळ बु. येथे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत माध्यमिक विद्यालय असून या विद्यालायामध्ये हिरवळ बु., शास्त्रीनगर, धोटाने खु., काळेवस्ती, तसेच परिसरातील अनेक गावांमधून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात, परंतु सकाळी १०:३० वाजता शाळा भरण्याच्या वेळेत व सायंकाळी ०४:३० वाजता शाळा सुटण्याच्या वेळेत बस नसल्याकारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांना घरीच राहावं लागतं किंवा प्रयत्न करून शाळेत आल्यानंतर घरी जाण्यास लवकर गाडी मिळत नसल्यामुळे रात्री उशिरा घरी जावं लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. सदर विद्यार्थ्यांना एस. टी. चा रितसर पासही आहेत. आणि विशेष म्हणजे ७० मुली व ४० मुलं असे एकूण ११० विद्यार्थी आहेत. या सर्व मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा महत्त्वाचा प्रश्न असून ते शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. यापूर्वी पालकांनी, स्थानिक ग्रामपंचायतींनी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आगार प्रमुख यांना वेळोवेळी विनंती केली असून, परंतु त्यांनी त्यांची कुठलीही दखल आपल्या स्तरावरून घेतली गेलेली नाही. तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी त्वरित बस सेवा सुरू करावी. अन्यथा नांदगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलने छेडण्यात येतील व त्यांच्या होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी. असा ईशारा मा. आगार प्रमुख, राज्य परिवहन महामंडळ आगार, नांदगाव यांना देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजुभाऊ पाटील, युवक अध्यक्ष सोपान पवार, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, सोशल मीडिया अध्यक्ष वाल्मिक टिळेकर, महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष अशोक पाटील,दत्तू पवार, दारासिंग भिडे, बाळासाहेब देहाडराय,अरूण अप्पर,डगळे सर, देशमुख सर,सनी पवार इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.