loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती विविध ठिकाणी साजरी

Jan 4, 2023


मनमाड ( योगेश म्हस्के )भारताच्या प्रथम महिला शिक्षीका , उत्तम कवियित्री , अध्यापिका , समाजसेविका आणि पहिल्या विद्याग्रहण करणाऱ्या महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती मनमाड शहरातील विविध संघटना , संस्था आणि शाळेमध्ये साजरी करण्यात आली.

भारतातील स्त्री शिक्षणाच्या जनक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सावित्री माईंनी महिलांना शिक्षण देण्यासाठी त्या काळी अनेकांच्या विरोधाचा सामना करून महिलांना शिक्षण देण्याचे काम केले , आज समाजामध्ये महिलांच्या अनेक क्षेत्रातील प्रगती मध्ये सावित्रीबाईंचे खुप मोठे उपकार आहे.मनमाड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथे महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले , शहरातील आय.यु.डी.पी. परिसरात असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका येथे मनमाड बचाव कृती समितीच्या सर्व महिला आणि पुरुष सदस्यांच्या वतीने ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले , आमदार श्री सुहासजी कांदे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये देखील शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले , मुरलीधर नगर येथील महिला मंडळाच्या वतीने देखील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील विविध शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून लहान मुलींनी सावित्रीबाई यांची भूमिका सादर केली.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.