loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा – जय भवानी व्यायामशाळेच्या सहा खेळाडूंची निवड

Jan 6, 2023

महाराष्ट्र ओलीम्पिक असोसिएशन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 9 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या सहा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे सुमारे 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक या राज्यस्तरीय मानाच्या स्पर्धेत मनमाड चे सहा खेळाडू नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत राज्यस्तरीय वरीष्ठ गटात केलेल्या ऊत्तम कामगिरी च्या आधारावर 45 किलो वजनी गटात दिया किशोर व्यवहारे,49 किलो वजनी गटात खुशाली निवृत्ती गांगुर्डे,55 किलो वजनी गटात नूतन बाबासाहेब दराडे,64 कीलो वजनी गटात वैष्णवी वाल्मिक ईप्पर 71 किलो वजनी गटात करुणा रमेश गाढे या महिला खेळाडूंची व 55 किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू व नुकत्याच नागरकोईल तामिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मुकुंद संतोष आहेर याची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेच्या वतीने निवड करण्यात आली आहे
छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांची वेटलिफ्टिंग या खेळासाठी तांत्रिक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तसेच राष्ट्रीय खेळाडू साक्षी संजय पांडे हिची नाशिक जिल्हा संघाची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ अरुण पाटील,क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे संदीप,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
.