loader image

महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ नांदगावला रॅली

Nov 13, 2024


आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश जगन्नाथ धात्रक यांचे प्रचारानिम्मित नांदगाव येथे प्रचार रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदरच्या रॅली व सभेला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.विशेष म्हणजे नागरिक हे कोणतीही अपेक्षा न करता रॅली व सभेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. रॅली ची सांगता शिवाजी चौक येथे सभेत झाली. सभेची प्रस्तावना अडओकॅटे सुधाकर मोरे यांनी केली, संतोष बळीद,विठ्ठल नलावडे,संजय कटारिया तसेच संतोष गुप्ता यांची पत्नी गुप्ता भाभी यांची भाषणे झाली.उमेदवार गणेशभाऊ धात्रक यांनी नांदगाव तालुका भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त करणे साठी मला निवडुन द्या असे भावनिक आव्हाहन केले,त्याच प्रमाणे गुप्ता भाभी यांनी निर्लज्ज व खोटे राजकारण करणाऱ्याना या निवडणुकीत पाडा व गणेशभाऊ सारख्या सच्चा व्यक्तीस निवडून द्या असे आवाहन केले,व्यासपीठावर महेंद्र बोरसे,सुधीर पाटील,नाझीम शेख,शाशीभाऊ मोरे,सुनील पाटील,श्रावण आढाव,रतन सोनवणे,मनमाड बाजार समितीचे आलेले सर्व संचालक, मनमाड चे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, महिला आघाडी च्या सदस्या व अन्य महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी हजारो पुरुष व महिला हजर होत्या.सभेचे सूत्रसंचालन अडओकॅटे सुधाकर मोरे यांनी केले


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.