loader image
[ays_poll id=7]

मध्यप्रदेशात धुक्यामुळे विमान धडकले मंदिराच्या घुमटाला; पायलटचा मृत्यमुखी तर एक गंभीर जखमी

Jan 6, 2023

मध्य प्रदेशातील रीवा येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे घटना घडली असून दुर्घटनाग्रस्त विमान मंदिराच्या घुमटावर आदळले आणि त्यानंतर कोसळले. या घटनेत विमानात उपस्थित पायलट आणि प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाले. या अपघातात बिहारमधील पाटणा येथील रहिवासी वरिष्ठ पायलट कॅप्टन विमल कुमार यांचा मृत्यू झाला. ते 54 वर्षांचे होते. ते बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होते. विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण होते.

खाजगी प्रशिक्षण कंपनीचे विमान मंदिराचा घुमट आणि विद्युत तारांना धडकले. ज्यामुळे पुढच्या काहीच क्षणात विमान अपघातग्रस्त झाले. ही घटना चौरहता पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावाच्या मंदिराजवळ घडली. जखमी पायलटला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दाट धुके हे विमान अपघाताचे प्रमुख कारण ठरल्याची माहिती प्राथमी चौकशीत पुढे आली आहे. उमरी विमानतळावर प्लॅटून कंपनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असे. गुरुवारी रात्री 11.30 वाजता पायलट कॅप्टन विमल कुमार जयपूर येथील सोनू यादव या विद्यार्थ्याला प्रशिक्षण देत होते. टेक ऑफ केल्यानंतर विमान मंदिराच्या घुमटावर आदळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमानाचे नुकसान झाले. स्फोटाचा आवाज ऐकून लोकांनी घराबाहेर धाव घेतली आणि विमानाचे अवशेष त्यांना आढळून आले.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. ज्यामध्ये उपचारादरम्यान गुरुवारी रात्री उशिरा पायलटचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.