loader image

पत्रकार दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न – २४५ नागरिकांची नेत्र तपासणी

Jan 7, 2023


मनमाड : 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त निर्भीड वृत्तपत्र संपादक पत्रकार संघ व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत मनमाड शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी एकूण 245 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
साप्ताहिक लोक वजीर चे संपादक व निर्भीड वृत्तपत्र संपादक पत्रकार संघचे अध्यक्ष सॅमसन आव्हाड यांनी नागरिकांच्या आग्रहास्तव शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी पत्रकार दिनानिमित्त शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिरास तुलसी आय हॉस्पिटल नाशिक चे मुख्य कार्यकारी संचालक मेजर डी.के.झरेकर, एच.आर.हेड फिलीप आवळे, आऊट्रीच मॅनेजर ज्ञानेश्वर कदम यांनी मोलाचे सहकार्य करीत अत्याधुनिक नेत्र तपासणी सुविधांनी सुसज्ज अशी मोबाईल आय क्लिनिक व्हॅन उपलब्ध करून दिली. या मोबाईल आय क्लीनिक सोबत आलेले डॉक्टर शेखर सोनवणे, भाऊसाहेब घुले, राधारमण शौचे, दीपक निकाळे यांनी शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी तीन पर्यंत तपासणीसाठी आलेल्या 245 नागरिकांची नेत्र तपासणी करीत अल्प दरात 100 रुपयात चष्मा देण्यात आला. तसेच शस्त्रक्रिया संबंधित पेशंटला नासिक येथे उपचारासाठी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन निर्भीड वृत्तपत्र संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष सॅमसन आव्हाड व डॉक्टर नितीन जाधव यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी निर्भीड वृत्तपत्र संपादक पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार व मित्रपरिवार अक्षर मंच संपादक बाळासाहेब अहिरे, एडवोकेट स्वप्निल व्यवहारे, सुशांत राजगिरे, का.क्षेत्र पत्रकार राजेंद्र धिंगाण, सागर अहिरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरास प्रशांत केदारी, राजेंद्र कुमार गुप्ता, पीटर फेरो, सचिन साबळे, दीपक कदम, सतीश आव्हाड, विजय आठवले, कलीम शेख, अरूण चांदेकर सर, येवल्याचे पत्रकार शाकीर शेख, दीपक काथवटे यांचे मोलाची सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.