loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंदांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Jan 12, 2023


के आर टी शाळेत राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता सातवीच्या अपेक्षा पगारे. तनिष्का कातकडे .वेदांगी गांगुर्डे .यांनी आपले मनोगत व्यक्त केले . इयत्ता दुसरीची नितीक्षा म्हसदे हिने राजमातांची वेशभूषा केली होती . तिने राजमातांविषयी दोन शब्द सांगितले. “वाघाची आई बनायला. काळीज वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते “स्वराज्य जननी राजमाता माॅसाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असा एकही माणूस नाही सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्नच बघितले नाही तर ते सत्यात सुद्धा उतरविले. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे .आई म्हणजे प्रेम .आपुलकी. त्याग .जिद्द. प्रेरणा. संयम .आणि. सामर्थ्य .यांचा संगम म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले लहानपणापासूनच अन्यायाची चिड असणाऱ्या जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला .”उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका “असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली .इयत्ता सातवीच्या कशिश आव्हाड. श्रावणी वैद्य. या विद्यार्थिनीने स्वामी विवेकानंद बद्दल गोष्ट सांगितली .स्वरा पांडे हिने स्वामी विवेकानंदांची वेशभूषा केली होती. स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान व्यक्ती तत्त्वज्ञानी .व .कुशल .वक्ता होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 18 63 रोजी कोलकत्ता येथे झाला. लहानपणी स्वामी विवेकानंदांवर त्यांच्या आई-वडिलांनी उत्तम संस्कार केले .त्यांनी तत्त्वज्ञान. धर्म. इतिहास. विज्ञान. कला. साहित्य. इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान मिळवले. त्याचबरोबर .वेद .उपनिषद .पुराण. रामायण .महाभारत .अशा ग्रंथांचा अभ्यास केला. तसेच ते खेळ व शारीरिक व्यायामातही कुशल होते. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले. स्वामी विवेकानंदांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले. त्यांनी अनेक ठिकाणी अनाथाश्रम वस्तीगृह रुग्णालय स्थापन करून समाजसेवेचे अनमोल कार्य केले. या विद्यार्थ्यांना सौ अनिता शाकाद्विपी .सौ सोनाली सरस्वती. यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळेस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीचा तेजस कातकडे यांनी केले


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.